(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी | मराठी १ नंबर बातम्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी

मुंबई ( १६ फेब्रुवारी २०१९ ) : जनसंवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी टाटा ट्रस्टस्‌च्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप) उपक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात संहिता लेखक-5 पदे, सोशल मीडियासाठी संहिता लेखक-1 पद, ग्राफिक डिझाईनर-2 पदे तसेच व्हिडिओ ॲनिमेटर-2 पदे अशा 10 पदांसाठी मानधन तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज करताना अर्जाचे शुल्क लागू असणार आहे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना रू 25 हजार (आयकर आणि अंशदायी भविष्य निर्वाह निधी वजा जाता अंदाज सुमारे 22 हजार रू.) मानधन देण्यात येणार असून यात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

जाहिरातीच्या अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्जाकरिता https://bit.ly/1IBkPoA या लिंकवर उमेदवारांनी लॉग-इन करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget