(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीस मान्यता | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीस मान्यता

मुंबई, दि. 20 : पुणे जिल्ह्यातील अंबी-तळेगाव येथील डी.वाय. पाटील युनिर्व्हसिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या विद्यापीठाची स्थापना करण्यासंदर्भात विधानमंडळासमोर सादर करावयाच्या विधेयकाच्या मसुद्यासही मंजुरी देण्यात आली. हे विद्यापीठ शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, सामाजिक पुनर्रचना आणि परिवर्तन याकरिता नवीन मार्ग शोधून त्याद्वारे सर्जनशीलता, अभिनव उपक्रम आणि उद्यमशीलता वाढावी यासाठी नवनवीन शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना मान्याता देण्यात येत असून अंबी येथील या विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण अधिकाधिक विस्तारण्यास मदत होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget