(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पोलीस अधीक्षक भुजबळ यांचे अपील शासनाकडून मान्य | मराठी १ नंबर बातम्या

पोलीस अधीक्षक भुजबळ यांचे अपील शासनाकडून मान्य

मुंबई, दि. 20 : कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरुन देण्यात आलेल्या शिक्षेविरोधात पोलीस अधीक्षक दिलीप किसनराव भुजबळ यांचे अपिल मान्य करून त्यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

भुजबळ हे धुळे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त असताना कर्तव्यात कसूर करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पोलीस महासंचालकांनी भुजबळ यांच्या मासिक वेतनातून एक वर्षासाठी दरमहा 275 रुपये एवढी रक्कम कपात करण्याची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भुजबळ यांनी शासनाकडे अपील केले होते. त्यानुसार या शिक्षेसंदर्भात शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. भुजबळ यांचे अपील मान्य न करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचे शासनास कळविण्यात आले होते. भुजबळ यांनी दाखल केलेल्या अपिलातील मुद्दे विचारात घेऊन, त्यांचे अपील मान्य करुन त्यांना दोषमुक्त करण्यात यावे, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget