(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : अनुदानित संस्थांमधील विद्यार्थी, प्रवेशितांच्या परिपोषण अनुदानात वाढ | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : अनुदानित संस्थांमधील विद्यार्थी, प्रवेशितांच्या परिपोषण अनुदानात वाढ

मुंबई, दि. 20 : शासनाच्या विविध विभागातंर्गत येणाऱ्या अनुदानित संस्थामधील विद्यार्थ्यांसह इतर अनुदानित संस्थांमधील बालके, वृद्ध, दिव्यांग आदी प्रवेशितांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावर्षी 2011 नंतर प्रथमच परिपोषण अनुदानात भरीव वाढ करण्यात येत असून ही वाढ 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार सामाजिक न्याय विभाग, विजाभज, इमाव, विमाप्र कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आणि इतर प्रवेशितांचे अनुदान 900 वरुन 1500 रुपये करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील कार्यरत अनुदानित मतिमंद बालगृह, मतिमंदांच्या विशेष शाळा, कार्यशाळा आणि महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित संस्थांमधील एचआयव्ही बाधित निवासी विद्यार्थ्यांचे अनुदान 990 वरुन 1650 रुपये करण्यात आले आहे.

या निर्णयाचा लाभ सामाजिक न्याय विभागाची अनुदानित वसतिगृहे, अनुसूचित जातीसाठीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थी, वृद्धाश्रमातील वृद्ध, विशेष शाळेतील अपंग, विशेष शाळेतील मतिमंद विद्यार्थी, विजाभज विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थी, ऊसतोड कामगार मुलांसाठीच्या आश्रमशाळा, महिला व बाल विकास विभागाच्या बालगृहातील बालके यांना होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget