(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर पुरस्काराने आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल सन्मानित | मराठी १ नंबर बातम्या

एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर पुरस्काराने आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल सन्मानित

मुंबई ( १२ फेब्रुवारी २०१९ ) : राष्ट्र उभारणीत उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यातूनच वेगाने विकसित होणाऱी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताकडे आकृष्ट होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

ईवाय प्रस्तृत ‘ईवाय एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर 2018 पुरस्कार’ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक विप्रो समुहाचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना जीवन गौरव पुरस्कार तर आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल यांना एन्टरप्र्येन्युअर्स ऑफ द इअर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीत खंबीर नेतृत्त्व म्हणून कामगिरी बजावत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचेही उद्योजकांच्यावतीने उभे राहून, टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उद्योजक राजीव मेहरोत्रा, उदय कोटक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत हा वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक आहे. देशाची आर्थिक विकासाची वाटचालही गेल्या काही वर्षात वैशिष्ट्यपूर्ण अशीच राहिली आहे. त्यामुळे विकासाच्या वाटचालीबाबत जगाची भारतावर नजर आहे. या वाटचालीत उद्योजकांनीच आपल्या धडाडीने मोठे योगदान दिले आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत गत चार वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली धाडशी निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळेही उद्योग क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. त्यातूनही मोठे परिवर्तन घडत आहे. जीएसटी कर प्रणाली, दिवाळखोरीबाबतची संहिता अशा सुधारणावादी योजनांमुळे एकूणच अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणली गेली आहे. “ईझ ऑफ डुईंग” बिझनेस या धोरणामुळे जगभरातील ग्लोबल सप्लाय चेनचेही भारतीय उद्योग जगताकडे लक्ष लागून राहिले आहे. यातून भारत गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. त्यातही विशेषतः महाराष्ट्रात सर्वात मोठी गुंतवणूक येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देण्याचे धोरण निर्धारित केले आहे. त्यामुळे या क्षेत्रातही अभुतपूर्व अशी गुंतवणूक आली आहे. यामुळे एकूणच उद्योग जगताचे चित्र बदलत आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यादृष्टीने असे पुरस्कार उद्योजकांना प्रोत्साहीत करणारे ठरतील, असा विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले.

विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यातून, त्यांच्या मानवतेच्या क्षेत्रातील कार्याचाही गौरव झाल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

या सोहळ्यात इनोव्हेटीव्ह स्टार्टअप संवर्गात बायजूच्या रवींद्र बायजू, कंझ्युमर प्राँडक्ट अँण्ड रिटेलमध्ये जग्वार समुहाचे राजेश मेहरा, मॅन्युफ्क्चरिंगमध्ये मिंडा इंडस्ट्रीजचे निर्मल मिंडा, लाईफ सायन्स अँण्ड हेल्थ केअरमध्ये इन्टास फार्मास्युटीकलचे दिनेश चुदगर, फायनान्शीअल सव्हिर्सेसमध्ये एयू स्माल फायनान्स बँक संजय अगरवाल, सर्व्हिसेसमध्ये ओयोचे रितेश अगरवाल, एनर्जी अँण्ड इन्फ्रास्टक्चर्समध्ये फिनिक्स मिल्सचे अतूल रूईया, एन्टरप्र्येन्युअल सीईओसाठी टायटनचे भास्कर भट्ट, बिझनेस ट्रान्सफर्मेशनमध्ये फ्युचर्स समुहाचे किशोर बियाणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget