(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पहिल्या ‘दक्ष’ पोलीस साहित्य संमेलनाचे आज मुंबईत आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

पहिल्या ‘दक्ष’ पोलीस साहित्य संमेलनाचे आज मुंबईत आयोजन

मुंबई, दि. 24 : रात्रंदिवस बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पोलीसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘दक्ष’महाराज्य राज्य पोलीस साहित्य संमेलन 2019 चे उद्घाटन सोमवारी, दि. 25 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 9.30 वा या आगळ्या वेगळ्या साहित्य संमेलन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अशोक बागवे, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची या संमेलनास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पोलीसांमध्येही साहित्यिक, कवी, लेखक लपलेला असतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखावी, यासाठी चोवीस तास सदैव दक्ष असणाऱ्या पोलीसांमधील हे साहित्य गुण समाजासमोर यावेत, यासाठी हे संमेलन होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच ‘दक्ष’ महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन होणार आहे. पोलीसांमधील साहित्यिकाला दाद देण्यासाठी त्यांच्या गुणांना वाखाणण्यासाठी, त्यांच्यातील साहित्याचे प्रांगण फुलविण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget