(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवी दिल्ली येथे अभिरुप मुलाखत प्रशिक्षण | मराठी १ नंबर बातम्या

नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवी दिल्ली येथे अभिरुप मुलाखत प्रशिक्षण

मुंबई ( २ फेब्रुवारी२०१९ ) : संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा-2018 मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नवी दिल्ली येथे अभिरुप मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून सुरू करण्यात आला असून 24 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने या अभिरुप मुलाखत प्रशिक्षण व क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 मार्च पर्यंत दर शनिवार आणि रविवारी हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. कमलाकर लाखे (भ्रमणध्वनी क्र. 9422109168) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जुने महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली-1 येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी www.preiasnagpur.org.in या संकेतस्थळावरील सविस्तर सूचना पहावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 022-22070942 किंवा 0712-2565626, भ्रमणध्वनी क्र. 9819093410 आणि 9422109168 व directoriasngp@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget