(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी राज्यात सर्वंकष कृती योजना - आरोग्यमंत्र्यांची माहिती | मराठी १ नंबर बातम्या

स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी राज्यात सर्वंकष कृती योजना - आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई ( १५ फेब्रुवारी २०१९ ) : हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव काहिसा जाणवत असून आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाईन फ्लूचे उपचार सुरु आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मिर या राज्यांसोबत यंदा या काळात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. यावर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसुत्रीचा वापर केला जात आहे.

स्वाईन फ्लू संदर्भात प्रभावीपणे जनजागृती होण्याकरिता विविध माध्यमांचा वापर करतानाच विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेयस्तरावर जनजागृती मोहीम घेणे, यात्रा, उत्सव, आठवडे बाजाराच्या ठिकाणी आरोग्य शिक्षण देणे आदी सर्वंकष कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अंमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.

जानेवारी ते आतापर्यंत या काळात सुमारे तीन लाख 50 हजार रुग्ण तपासण्यात आले आहे. त्यापैकी चार हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्लूचे 145 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर या ठिकाणी 10 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लू संदर्भात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सर्वंकष कृती योजना अंमलात आणण्यासाठी विभागाला निर्देश‍ दिले असून स्वाईन फ्लूसंदर्भात प्रबोधनात्मक संदेश तयार करुन हा आजार कसा पसरतो, त्याची लक्षणे, हा आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आजार पसरु नये म्हणून घ्यावयाची काळजी, या आजारावरील उपचाराबाबत माहिती यासंदर्भात सामान्यांना माहिती द्यावी. त्याचबरोबर सर्व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी नर्सेस, आरोग्यसेवक यांची मदत घेऊन मार्गदर्शन करावे. ग्रामीण भागात असणाऱ्या ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती तसेच शहरी भागात असलेल्या महिला आरोग्य समित्यांच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांचे यासंदर्भात प्रबोधन करावे. जेणेकरुन प्रतिबंधात्मक संदेश समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत जाण्यास मदत होईल.

राज्यातील बहुतांश भागात या कालावधीत ग्रामीण भागात यात्रा, जत्रा आणि उत्सवांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी स्वाईन फ्लूसंदर्भात जनजागृती करण्याकरिता मोहीम हाती घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. स्वाईन फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात असून प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूवरील प्रतिबंधात्मक असलेल्या टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget