(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट येथे आज रोजगार मेळावा | मराठी १ नंबर बातम्या

के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट येथे आज रोजगार मेळावा

मुंबई दि. 21 : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शुक्रवार, दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत युवक-युवतींकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. के. जे. सोमय्या इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, सोमय्या आयुरविहार कॉम्प्लेक्स, ईस्टन एक्सप्रेस हायवे, सायन (पूर्व) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एकदिवसीय रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील असिस्टंट मॅनेजर, इंजिनिअर्स, मशिनिस्ट, टर्नर फिटर, वेल्डर, बँकिग/सेल्स/इन्शुरन्स/ बॅक ऑफीस एक्झिक्युटिव्ह अशा पदांसाठी अनेक उद्योग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 18 ते 30 वर्षे वयोगटातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहितीसाठी rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर किंवा 022-22626306 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget