(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यात कॉप शॉप योजनेतून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीतून थेट लाभ | मराठी १ नंबर बातम्या

राज्यात कॉप शॉप योजनेतून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीतून थेट लाभ

मुंबई ( १८ फेब्रुवारी २०१९ ) : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा आणि शहरी भागातील गृह निर्माण संस्थेतील ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल मिळावा म्हणून शासनाने कॉप शॉप हा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांशी जोडल्याने या योजनेतून रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. त्यामुळे अशा योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

देशमुख म्हणाले की, शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल महापणन विकास अभियाना अतंर्गत राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीतून थेट लाभ होत आहे. आतापर्यंत शहरी भागातील शंभराच्यावर गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप सुरू झाले आहेत. ग्राहकांनासुध्दा योग्य दरात ताजा आणि वैविध्यपूर्ण भाज्या, फळे, धान्यासह गरजेच्या वस्तू मिळत आहे. शासनाने अटल महापणन विकास अभियानांतर्गत ५ हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट यांच्या शेती उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शहरी भागातील गृह निर्माण संस्थामध्ये कॉप शॉप सुरू केले आहे.

मुंबईत - ६७, ठाणे – १५, पालघर – ३, रायगड – २, पुणे-२०, पनवेल - २, अमरावती १ व नागपूर १ असे एकुण १११ कॉप शॉप सुरू झाले आहेत. सदर कॉप शॉपसाठी लागणारा शेतीमाल विक्रमगड जव्हार, मोखाडा, वाडा, मुरबाड, शहापूर, पुणे, जुन्नर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, अमरावती व नागपूर या भागातील सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांशी जोडले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आठवड्यातून ठरवून दिलेल्या दिवशी सोसायटयांपर्यत पोहचविण्यात येत आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील १००० गावांतील शेतकऱ्यांना या कॉप शॉप सारख्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहकारी संस्थांशी जोडण्यात येत आहे. शहरी भागात शेतीमाल आणताना सहकारी संस्थांची अडवणूक होणार नाही, शेतीमालाच्या वाहतूक, विक्री आणि साठवणूकीसाठी सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच गृह निर्माण संस्थांमध्ये ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल (अन्न धान्य, फळे, भाजीपाला), प्रक्रिया उत्पादने उपलब्ध होत आहेत असेही ही देशमुख यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget