(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वाटूर येथे कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या

वाटूर येथे कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जालना ( ७ फेब्रुवारी २०१९ ) : आजघडीला पारंपरिक शेतीमध्ये अधिकचे उत्पन्न घेण्याच्यादृष्टीने रासायनिक खते तसेच किटकनाशकाच्या अती वापराने शेतीची सुपिकता घटत चालली आहे. रासायनिक खतापासून निर्मित अन्नधान्यामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. जमिनीचा पोत टिकून राहून कमी खर्चात नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

वाटूर येथे आर्ट ऑफ लिव्हींग व शासनाचा आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान कृषिमंत्र २०१९ नैसर्गिक शेती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात नैसर्गिक शेतीच्या प्रचार व प्रसाराबरोबरच जलसंधारणाची कामे, युवकांसाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

शासनाच्या विविध कृषि योजना, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करुन आपली उन्नती साधावी या दृष्टिकोनातून या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विजयअण्णा बोराडे यांच्या माध्यमातून खरपुडी येथे कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीमधील नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगत कडवंची या गावाने शेततळ्याची निर्मिती करुन पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करत दुष्काळी परिस्थितीमध्येसुद्धा कोट्यावधी रुपयांचे द्राक्षाचे पीक घेतल्याचे नमूद करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे शेती केल्यास त्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल, असा विश्वासही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत हा कृषिप्रधान देश असून ७० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीव्यवसायावर निर्भर आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत. वाटूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची व नैसर्गिक शेतीची माहिती मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असून या प्रदर्शनाची शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी दिली.

सर्वप्रथम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते फित कापून कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget