(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लेखा व कोषागार विभागाच्या ‘ई-कुबेर’ प्रणालीचा शुभारंभ | मराठी १ नंबर बातम्या

लेखा व कोषागार विभागाच्या ‘ई-कुबेर’ प्रणालीचा शुभारंभ

मुंबई ( १ फेब्रुवारी२०१९ ) : लेखा व कोषागार विभागाचे संगणकीकरण सद्यस्थितीत कोणत्याही खासगी संस्था आणि उत्कृष्ट बँकींग प्रणालीपेक्षा उत्तम आहे. संगणकीय प्रणालीत अधिक सूटसूटीतपणा आणि त्याचा फायदा थेट लोकांना होईल अशा संगणकीय प्रणाली विकसित केल्या पाहिजेत अशी अपेक्षा वित्त (लेखा व कोषागार)विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी आज महाराष्ट्र लेखा व कोषागार वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत व्यक्त केली.

महाराष्ट्र लेखा व कोषागार वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील एमएमआरडीए कार्यालयात आयोजित कार्यशाळेत आज भारतीय रिझर्व बँक पुरस्कृत "ई-कुबेर" या संगणकीय प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे, लेखा व कोषागार संचालक ज. र. मेनन, अप्पर पोलिस आयुक्त अतुल पाटील,संचालक श्री नागरगोजे, बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गो. रा. आमले, लेखा वे कोषागार संचालनालयातील उपसंचालक, सहायक संचालक आणि विविध शासकीय विभागाचे लेखाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखा व कोषागार विभाग हे उत्तम, शिस्त्‍ाप्रिय आणि चांगले खाते असल्याचे गौरवोद्गार काढत श्री. गद्रे म्हणाले, राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय आणि कोषागार कार्यालयाचे काम अतिशय उत्तम पध्दतीने सुरु आहे. अने‍क विभागात काम करत असताना इतर ठिकाणी ज्याप्रमाणे घोळ आढळून येतात तसे प्रकार या खात्यात आढळून आलेले नाहीत. देयकांबाबत गेल्या वर्षभरात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या मात्र या तक्रारीतील प्रकरणांमध्ये कोषागार कार्यालयाने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या योग्य आढळून आल्या आहेत. देयकांना मान्यता देण्‍याबाबत अनेक वेळा अधिकाऱ्यांवर दबाव येत असतो मात्र अशा दबावांना बळी न पडता योग्य व ठाम भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी शासन उभे राहील, असे आश्वासन देऊन अपरिहार्य परिस्थितीत कोषागारामध्ये ज्या घटना घडतात अशा प्रकरणांची चौकशी करुन अधिकाऱ्यांची भूमिका जेव्हा योग्य आहे असे सिध्द होते त्यावेळी संपूर्ण खाते त्यांच्या पाठीशी उभे राहते ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना गद्रे यांनी यावेळी व्यक्त केली.

लेखा व कोषागार विभागाच्या संगणकीकरणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, इतर राज्यांना भेटी देऊन त्यांच्या कोषागार प्रणालींचा अभ्यास करावा व त्याप्रमाणे आपल्या प्रणालीत दुरुस्त्या व सुधारणा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याबरोबर लेखा व कोषागार खात्याकडे बऱ्याच इमारती , पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्या आधुनिकीकरणासाठी सरकार सकात्मक आहे. त्यामुळे संचालनालयाने या इमारतीच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ही गद्रे यांनी दिले.

लेखा व कोषागार संचालनालय आणि अधिनस्त्‍ कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी संचालनालयाच्या अधिकारी व कर्मचारी कल्याण समिती (डॅटसॅा) मार्फत राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना श्री. गद्रे यांच्या हस्ते पारितोषिक व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले तसेच या स्पर्धसाठी आर्थिक मदत करणाऱ्या विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी लेखा व कोषागार संचालनालयाची स्मरणिका -2018 प्रकाशित करण्यात आली. या कार्यशाळेत विविध विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नृत्य, गायन, पोवाडे आणि शास्त्रीय संगीत सादर करुन सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

आजपासून सर्व देयक प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे

लेखा व कोषागारे दिनाचे औचित्य साधून भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेल्या ई-कुबेर प्रणालीचा आज शुभारंभ करण्यात आला असून ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर आज 1 फेब्रुवारी पासून कार्यान्वीत झाली आहे. याकरिता वित्त विभागाच्या अधिपत्याखालील अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई या कार्यालयाची सर्व प्रदाने ई-कुबेर प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या कार्यालयाची सर्व प्रदाने 31 मार्च 2019 पर्यंत तांत्रिक अडचणीशिवाय सुरळीत जमा झाल्यानंतर दि.01 एप्रिल 2019 पासून सदर कार्यपद्धती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व कोषागार कार्यालय, नागपूर यांच्या अंतर्गत येणारे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या देयकांचे प्रदान करण्याकरिता अवलंबली जाणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget