राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणासाठी राजभवन येथे बैठक झाली. त्यावेळी राव बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिंदाल फाऊंडेशनच्या संगीता जिंदाल, वास्तुविशारद प्रिती सांघी, वास्तुविशारद आभा नारायण लांबा, स्टोन डॉक्टर्स संस्थेचे हार्वेश मारवा व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राव म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुची स्वच्छता, परिरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महापालिका आयुक्त व वास्तुविशारद तज्ज्ञ यांनी मुंबईतील इतर हेरिटेज वास्तुप्रमाणे गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरण्याबाबतचा अहवाल लवकर सादर करावा. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासन राज्यातील हेरिटेज वास्तुचे संरक्षण व जतन करीत असून हे करताना वास्तू आहे त्या स्थितीत ठेवून त्याचे सुशोभीकरणही केले जाईल.
टिप्पणी पोस्ट करा