(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रामायण महोत्सवाच्या आयोजनाची परिपूर्ण तयारी करावी - पर्यटन मंत्री जयकुमार रावल | मराठी १ नंबर बातम्या

रामायण महोत्सवाच्या आयोजनाची परिपूर्ण तयारी करावी - पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबईत 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव

मुंबई ( ५ फेब्रुवारी २०१९ ) :  महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात झाली.

पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स, इंडोनेशियाचे कलाकार या महोत्सवात संस्कृत आणि हिंदी भाषेत रामायण सादरीकरण करणार आहेत. हा महोत्सव मुंबईच्या माध्यमातून जगासमोर सादर केला जावा. त्यासाठी परिपूर्ण अशी तयारी करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री रावल यांनी यावेळी दिले.

भारतासह 4 देशातील कलाकारांकडून सादर केल्या जाणाऱ्या रामायण महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सिनेमा, उद्योग, क्रीडा, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे.

सादर होणाऱ्या या महोत्सवात शेकडो देशी विदेशी कलाकार रामायण सादर करतील. यासाठीच्या तिकिटांची ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे. 2 तासाचा दररोज प्रयोग होईल. प्रत्येक देश एक दिवस सादरीकरण करणार आहे. टाइम्स फाउंडेशन या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर आहेत.

या कार्यक्रमाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तमेळा २०१९ च्या उद्घाटन सोहळ्यात केलेली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget