मुंबई ( १४ फेब्रुवारी २०१९ ) : राज्य शासनाने रेशीम शेती उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी नाविण्यपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत. रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल महाराष्ट्राला उद्योन्मुख राज्याचा पुरस्कार मिळाला आहे, असे सांगून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आभार मानले.
देशमुख म्हणाले, जगात रेशीम वस्त्रांची मागणी मोठया प्रमाणात आहे. रेशीम शेती उद्योग टिकून राहावा आणि यातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रेशीम शेती उद्योग करणा-या शेतकऱ्यांना विभागामार्फत अनुदान तसेच प्रशिक्षण दिले जात आहे.
रेशीम शेती उद्योगाला पूर्ण कृषीचा दर्जा मिळावा यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यासमितीमध्ये रेशीम क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी विद्यापीठातील कुलगुरू, अनुभवी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास इतर शेतकऱ्यांना मिळणारे सर्वच लाभ रेशीम शेती करणा-यांनाही मिळतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा