(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘आरजे’ करणार मतदार जागृती | मराठी १ नंबर बातम्या

‘आरजे’ करणार मतदार जागृती

मुंबई ( १८ फेब्रुवारी २०१९ ) : नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी धावपळ करणारा चाकरमानी… महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी गडबडीत असणारा विद्यार्थी… छोटा मोठा व्यवसाय करणारा व्यावसायिक… असे कोणीही असो. मुंबईकरांना एफ.एम. रेडिओचे भलतेच वेड! सकाळी, संध्याकाळी लोकल प्रवासात, बस प्रवासात अनेकांच्या कानात इअरफोन नक्कीच दिसतील. आता याच एफ.एम. चा वापर मतदार जागृतीसाठी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने ठरविले असून एफएमच्या रेडिओ जॉकींचे (आर.जे.) मतदार जागृतीसाठी सहाय्य घेण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबईतील एफ.एम. वाहिन्यांच्या रेडिओ जॉकीची बैठक अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी घेतली. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह आकाशवाणी एफ.एम. गोल्ड, एफ.एम. रेनबो, रेडिओ मिर्ची, रेड एफएम, रेडिओ नशा, फीवर एफएम, मॅजीक एफएम, इश्क एफएम आदींचे आरजे उपस्थित होते.

मतदार नोंदणीसाठी पात्र मात्र अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही अशा व्यक्तिंनी मतदार नोंदणीसाठी कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यायची, हेल्पलाईनचा कसा वापर करायचा, मतदार नोंदणी, तपशीलात दुरुस्ती, पत्त्यात दुरुस्ती आदींसाठी कोणते अर्ज भरायचे, प्रत्यक्षरित्या कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी अर्ज भरायचा असल्यास काय कार्यपद्धती राहील, आदींबाबत शिंदे यांनी ‘आरजें’ च्या शंकांचे निरसन केले. युवा मतदार आणि महिला मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी आरजेंनी एफ एम रेडिओवरुन वेळोवेळी आवाहन करावे आणि या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी यावेळी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget