मुंबई ( २४ जानेवारी २०१९ ) : बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84(4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी संघटनात्मक व कायदेशीर आणि आर्थिक व लेखाविषयक बाबीविषयी प्रारुप लवाद नामतालिका सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांचे sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.
त्याचप्रमाणे लवाद नामतालिकासाठी अपात्र अर्जदारांची यादीही या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. प्रारुप नामतालिकेवर दि. 31 जानेवारी 2019 पर्यत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे
यांचे कार्यालयातील कायदा व वैधानिक कार्यवाही कक्षामध्ये हरकतीवर दि. 18 फेब्रुवारी 2019 पर्यत निर्णय घेऊन दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिध्द केली जाईल, असे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई विभाग, यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा