(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाविद्यालयांनी महाडिबीटी प्रणालीमधील अर्ज 28 फेब्रुवारी पर्यंत मंजुर करावे. | मराठी १ नंबर बातम्या

महाविद्यालयांनी महाडिबीटी प्रणालीमधील अर्ज 28 फेब्रुवारी पर्यंत मंजुर करावे.

मुंबई, दि.22 : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांनी महाडिबीटी शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परिक्षा प्रणालीमधील महाविद्यालयास्तरावरील विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज तपासुन दि. 28 फेब्रुवारी,2019 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर व उपनगर यांच्या लॉगिनवर पाठविण्यात यावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी परिपत्रकाव्दारे केले आहे.

अजा,विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा अर्ज महाविद्यालयांनी मंजुर करुन दि. 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर व उपनगर यांच्या लॉगिनवर पाठविण्यात यावे. दि. 28 फेब्रुवारी नंतर अर्ज पाठविता न आल्यास व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील असेही या परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget