आज आझाद मैदान येथे एनसीसी दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तावडे विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते. याप्रसंगी एनसीसी कॅडेट्सने सैन्य विभागातील युद्ध, एरो मॉडेलिंग, सेमफोन शस्त्रे तसेच भारताच्या बहुरंगी सांस्कृतिक कौशल्यांचे प्रदर्शन केले. एनसीसीचे अतिरिक्त संचालक, महासंचालक, महाराष्ट्राचे एनसीसी निर्देशक अनेक नागरी व लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, एनसीसीचे मनुष्यबळ नेव्ही, सैन्य, वायुसेना या माध्यमातून प्रभावीपणे मोठ्या संख्येने वाढत आहे. तसेच या दलांची विविध क्षेत्रातील प्रगती आणि योगदान उल्लेखनीय आहे. देशावर कोणतीही आपत्ती किंवा संकट ओढवल्यास एनसीसी आपल्याला मदत करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, तावडे यांनी येथे प्रदर्शित भारतीय वायु सेना दलातील विविध अवजारांची, शस्त्रांची पाहणी केली आणि एन. सी. सी. कॅडेट्स सोबत शिक्षण आणि क्रीडा विषयावर चर्चा करून सुसंवाद साधला.
टिप्पणी पोस्ट करा