(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); टाटा रुग्णालयाच्या आवारातील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन आराखड्याच्या कामास गती देण्याचे गृहनिर्माणमंत्र्यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या

टाटा रुग्णालयाच्या आवारातील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन आराखड्याच्या कामास गती देण्याचे गृहनिर्माणमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 : टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या आवारात अनेक वर्षापासून असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास दिले.

अणुऊर्जा विभागांतर्गत टाटा मेमोरिअल रूग्णालयाच्या आवारात अतिक्रमित भूखंडाच्या पुनर्विकासासंदर्भात गृहनिर्माणमंत्री महेता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या भूखंडाचा विकास करण्यासाठी दहा दिवसांच्या आत सर्व्हेक्षण करण्यासाठी टाटा रूग्णालयाने ना हरकत परवानगी द्यावी. या भूखंडाचा विकास करताना गेली ६० ते ७० वर्षे रहिवाशी असलेल्या तेथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे. संबंधित भूखंडाची विभागणी करून रूग्णालय, झोपडपट्टी धारक आणि विकासकासाठी खुल्या विक्रीसाठी जागा देण्यासंदर्भातला आराखडा तयार करण्याच्या सूचना देऊन या आराखड्यात जास्तीत जास्त जागा ही टाटा रूग्णालयाच्या इमारतीसाठी देण्यात यावी तसेच, इमारतीचे बांधकाम करून ती विनामूल्य टाटा रुग्णालयाकडे सुपुर्द करण्याचे निर्देशही महेता यांनी यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget