(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कुपरेज येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य तिरंगा व अखंड भीमज्योत उभारणार | मराठी १ नंबर बातम्या

कुपरेज येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य तिरंगा व अखंड भीमज्योत उभारणार

मुंबई ( ५ फेब्रुवारी २०१९ ) : कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी आमदार भाई गिरकर, राज पुरोहित, सामाजिक न्याय व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

याविषयी बडोले म्हणाले, कुपरेज-ओव्हल मैदानावरील भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबतचा सर्व खर्च सामाजिक न्याय विभाग करेल व राष्ट्रीय तिरंगा ध्वज व भीमज्योतीची देखभाल मुंबई महानगरपालिका करेल. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget