(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अखिल भारतीय सातारा सैनिक स्कूल सहावीच्या पेपर एकची पुन:परिक्षा 24 फेब्रुवारी | मराठी १ नंबर बातम्या

अखिल भारतीय सातारा सैनिक स्कूल सहावीच्या पेपर एकची पुन:परिक्षा 24 फेब्रुवारी

मुंबई दि. 28 : अखिल भारतीय सैनिक स्कूलमार्फत इयत्ता सहावीचा पेपर-1 प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. ही परीक्षा आता 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

जे विद्यार्थी 6 जानेवारी 2019 रोजी परीक्षेस बसले होते त्याच विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी रोजी परीक्षा देता येणार आहे. या पुन:परीक्षेसाठी परीक्षा प्रवेश पत्र सातारा सैनिक स्कूलमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच पुन:परिक्षेचे प्रवेशपत्र www.sainikschooladmission.in या संकेतस्थळावरुन 8 फेब्रुवारी 2019 पासून डाऊनलोड करता येतील.

जे विद्यार्थी 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणाऱ्या पुन:परीक्षेला उपस्थित नसतील त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात येईल, असे सैनिक स्कूलचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ‍
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget