(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून मदत | मराठी १ नंबर बातम्या

पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून मदत

ग्रामसेवक संघटनेकडून 2 लाखाचा तर लिपिक वर्गीय संघटनेकडून 11 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

मुंबई, दि. 20 : काश्मिरमधील पुलवामा येथील शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला - बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी आज मंत्रालयात मदतीचे धनादेश मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले.

भारताच्या शूरविरांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी स्वेच्छेने आर्थिक योगदान देण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी समाज माध्यमांद्वारे केले होते. त्यास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी मंत्रालयातील ग्रामविकास, महिला बालविकास विभागासह मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपयांपेक्षा जास्त मदतीचे धनादेश जमा केले. आज राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उपसचिव गिरीष भालेराव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने 2 लाख रुपयांच्या रक्कमेचा धनादेश संघटनेच्या प्रतिनिधिंनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला. तसेच या संघटनेसह जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या संघटनांची भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांकडून किमान 100 रुपयांचे योगदान स्वेच्छेने देणार असल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी 11 हजार रुपयांच्या मदतीचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषीवर्गीय राजपत्रित संघटनेच्या प्रतिनिधींनी सर्व अधिकारी किमान 100 रुपयांचे योगदान स्वेच्छेने देणार असल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले.

मंत्री कार्यालयातील कर्मचारी अजय डहाके यांच्या पत्नी अंजली डहाके यांनीही आज १ हजार १ रुपये रकमेचा धनादेश दिला.

खाली दिलेल्या बँक अकाउंटमध्ये Bharat Ke Veer या नावाने बँक ट्रान्सफर किंवा धनादेश किंवा रोख रक्कम भरुन ह्या सत्कार्यामध्ये हातभार लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Account Name – Bharat Ke Veer

State Bank of India – New Delhi Main Branch (0691)

Account Number – 36724508925

IFSC Code – SBIN0000691

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget