(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बचतगटांची उत्पादने आता ऑनलाईन खरेदी करता येणार | मराठी १ नंबर बातम्या

बचतगटांची उत्पादने आता ऑनलाईन खरेदी करता येणार

‘महालक्ष्मी ई-सरस’ अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

मुंबई ( ३० जानेवारी २०१९ ) : बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या विविध वस्तू नियमित व वर्षभर ग्राहकांना मिळाव्या याकरिता ‘Mahalaxmi eSaras’ मोबाईल ऑनलाईन अॅप सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून सध्या मुंबई व नवी मुंबई येथील ग्राहकांना थेट मोबाईल अॅपद्वारे हव्या त्या वस्तू मागविता येतील. गुगल प्ले स्टोअरवर नुकतेच हे ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सध्या या ॲपवर ५० वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भविष्यात ॲपवर वस्तुंची संख्या आणखी वाढविण्यात येईल, अशी माहिती उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली. तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील अनुभव लक्षात घेऊन लवकरच इतर भागातील ग्राहकांनाही या ॲपवरुन खरेदीची सोय सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले. वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नुकतेच या ॲपचे अनावरण करण्यात आले होते. आता हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. ग्राहक हे ॲप डाउनलोड करुन त्या माध्यमातून बचतगट उत्पादीत विविध वस्तू घरबसल्या खरेदी करु शकतात.

सध्या या ॲपवर खाद्य उत्पादने, हातमाग उत्पादने, वस्त्र उत्पादने, ज्वेलरी, हार्बल, कॉस्मॅटिक्स, युटिलीटी साहित्य उपलब्ध आहे. विशेष करुन पर्स, हँड बॅग, लाकडी कंदील, बांबूपासून बनविलेली बुद्ध मुर्ती,
बांबूपासून बनविलेला पंखा, टोपल्या, बांबूपासून बनविलेला डस्टबीन, निम ऑईल, ईअर रिंग्ज, गोट मिल्क सोप, हेअर क्लच, पैठणी साडी, कोशा सिल्क साडी, कश्मिरी कुर्ते, मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या टोप्या आदी साहित्य खरेदीसाठी उलब्ध आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget