(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पहिल्या ‘मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराचे’ | मराठी १ नंबर बातम्या

पहिल्या ‘मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराचे’

मुंबई ( २९ जानेवारी २०१९ ) : पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने प्रथमच ‘मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार’ देण्यात येत आहे. दिल्लीत ३१ जानेवारी रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मुकनायक’ हे पाक्षिक सुरु केले या घटनेस पुढील वर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या वतीने मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना ‘मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार’प्रदान करण्यात येणार आहे. दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्काराचे स्वरूप

मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकारास ‘मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, या दोन्ही माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकाराला प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ लाख रूपये रोख आणि सन्मानपत्र असे मुख्य पुरस्काराचे तर ५१ हजार रूपये आणि सन्मानपत्र असे प्रोत्साहनपर पुरस्काराचे स्वरूप आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद्र गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे संचालक के. जी. सुरेश आदी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget