मुंबई, दि 22 : लोकसभा निवडणूक 2019 साठी ऑनलाईन मतदानाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसून अशी सुविधा उपलब्ध असल्याबाबतचा व्हॉट्सॲपवरील संदेश चुकीची माहिती पसरवित आहे, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
भारतीय पासपोर्ट धारक अनिवासी नागरिक (एनआरआय) आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी ऑनलाईनरित्या मतदान करुन शकतील अशा आशयाचा चुकीचा संदेश सोशल मिडीयावरुन विशेषत: व्हॉट्सॲपवरुन फिरत आहे. त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हे स्पष्टीकरण केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने भारतीय नागरिक तसेच अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मतदार नोंदणीची ऑनलाईन सुविधा nvsp.in या पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे अनिवासी नागरिकांनाही ऑनलाईनरित्या मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. परंतु मतदान करण्यासाठी संबंधित अनिवासी भारतीयास त्याचे नाव समाविष्ट असलेल्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊनच मतदान करावे लागणार आहे असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा