(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजन


मुंबई ( २४ जानेवारी २०१९ ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईतील आयआयटी पवई येथे दि. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या काळात चौथ्या ‘जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील सुमारे पन्नास देशातील 1 हजाराहून अधिक तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती
मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

आपत्ती व्यवस्थापन परिषदेची माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्‌य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन पुढाकार आणि कन्व्हर्जन्स सोसायटी (डीएमआयसीएस) यांच्या सहकार्याने ही परिषद होणार आहे.

या जागतिक परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पवईमधील आयआयटीच्या परिसरात होणार आहे. या परिषदेचे घोषवाक्य Building the Future We Want: Bridging Gaps between promises and Action आहे.

परिषदेच्या आयोजनात भारत सरकार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्था, विविध राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, संयुक्त राष्ट्र संघटनेतंर्गत यूएनडीपी, युनिसेफ, युनिस्केप, यूएनएसडीआर, जागतिक आरोग्य संघटना (WHO) इत्यादी संस्था त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील एफआयसीसीआय व सीआयआय या संस्थासह विविध विद्यापीठे, तांत्रिक संस्था सहभागी होणार आहेत, असेही श्री. पाटील यांनी दिली.

परिषदेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एक हजाराहून जास्त सदस्यांनी नोंदणी केलेली आहे. या परिषदेत संशोधक प्रबंध वाचण्यासाठी सुमारे पाचशे पेक्षा जास्त संशोधकांनी आपले प्रबंध परिषदेदरम्यान
मान्यतेसाठी पाठविलेले आहेत. यामध्ये शंभर पेक्षा जास्त प्रबंध हे परदेशातील सुमारे 50 देशातील संशोधकांनी सादर केलेले आहेत. आज अखेर यापैकी 25 पेक्षा जास्त प्रतिनिधीनीं प्रत्यक्ष परिषदेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. या देशांमध्ये बांगलादेश, अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, नेपाळ, नेदरलँड, स्पेन, कॉस्टारीका, ब्राझील, थायलंड, आइसलॅन्ड, साऊथ आफ्रिका, फिलिपाइन्स, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश
आहे, अशी माहिती श्रीमती गाडगीळ व श्री. देसाई यांनी सांगितले.

या परिषदेमध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयातील 40 जागतिक दर्जाचे व्याख्यात्याना आंमत्रित करण्यात आले आहे. हे व्याख्याते या परिषदेदरम्यान विविध विषयावरील विशेष सत्रामध्ये आपली व्याख्याने देणार
आहेत. या परिषदेमध्ये पाच विशेष सत्राचेही आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये “महापौर आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन”, “तरुण आाणि आपत्ती व्यवस्थापन”, “संशोधक व नाविन्यपूर्ण उत्पादन करणारे घटक”, “आपत्ती व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा वापर” आणि “प्रसार माध्यमे व आपत्ती व्यवस्थापन” या विविध विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (All India Institute of Local Self Governance) या
संस्था सहभागी होणार आहेत.

या परिषदेदरम्यान आपत्ती व्यवस्थापनातील विविध पैलूवर आधारित 70 पेक्षा जास्त स्टॉल असलेले प्रदर्शन उभारण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था व कंपन्या यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संदर्भात काम करणाऱ्या संस्थाकडून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादनांचेही प्रदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेची सांगता दि. 1 फेब्रुवारी राजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या परिषदेत राज्यातील विविध जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रतिनिधीही उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget