(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रालयात शहिदांना श्रद्धाजंली | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रालयात शहिदांना श्रद्धाजंली

मुंबई ( १५ फेब्रुवारी २०१९ ) : जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 39 जवान शहिद झाले. या मृत शहिदांना आज मंत्रालयात महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.

यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव राजीव निवतकर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते, महसूल विभागाचे उपसचिव किरण वडते आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget