(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील पाचजणांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्रातील पाचजणांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’

नवी दिल्ली ( २५ जानेवारी २०१९ ) : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील 48 व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2018’ आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर 'सर्वोत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. डॉ. चरणजितसिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार धैर्यशिल आडके यास जाहीर झाला आहे. देशातील 48 नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील 8 व्यक्तिंना मरणोत्तर 'सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत. ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 15 जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’25 जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधित राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget