(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); व्हाईस ॲडमीरल एस. एन. घोरमोडे यांनी स्वीकारली नौदलाच्या पूर्व कमांडची धुरा | मराठी १ नंबर बातम्या

व्हाईस ॲडमीरल एस. एन. घोरमोडे यांनी स्वीकारली नौदलाच्या पूर्व कमांडची धुरा

नवी दिल्ली ( १४ फेब्रुवारी २०१९ ): अतीविशिष्ट सेवा पदक व नौसेना पदकाने सन्मानित महाराष्ट्राचे सुपूत्र व्हाईस ॲडमीरल एस. एन. घोरमोडे यांनी आज विशाखापट्टनम येथे नौदलाच्या पूर्व कमांडच्या प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला.

घोरमोडे १९८४ मध्ये भारतीय नौदलात कमांडीग ऑफिसर म्हणून रूजू झाले. त्यांनी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीसह मुंबईतील नेव्हल वॉर कॉलेज आणि न्युपोर्ट येथील युनायटेड स्टेट्स नेव्हल स्टॉफ कॉलेजमधून पदवी संपादन केली. ‘संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास’ या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.फील आणि पुण्यातील सिंबायोसीस बिजनेस मॅनेजमेट इन्स्टिटयूटमधून पर्सनल मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

नौदलातील ३५ वर्षांच्या दिर्घ सेवेत त्यांनी विविध मोहिमांमध्ये योगदान दिले तसेच त्यांनी विविध पदही भूषविली आहेत. त्यांच्या योगदानासाठी २०१७ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २००७ मध्ये नौसेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget