(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राजधानीत ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

राजधानीत ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

नवी दिल्ली ( ४ फेब्रुवारी २०१९ ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्यावतीने 15 ते 19 फेब्रुवारी 2019 दरम्यान छत्रपती शिवाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘छत्रपती शिवाजी महोत्सवात’ वैविद्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून हे सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गावरील मावळणकर सभागृहात करण्यात येणार आहे.

प्रसिध्द नाटक ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ चे सादरीकरण

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व आतापर्यंत 700 हून जास्त प्रयोग झालेले ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायं.6.30 वा. सादर होणार आहे. विद्रोही शाहीरी जलसा व रंगमांळा यांचे सादरीकरण असणा-या या नाटकाची संकल्पना व गीत प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांचे आहे. नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे तर दिग्दर्शक नंदू माधव आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी जागतिक किर्तीचे कलाकार एस.बी.पोलाजी यांनी रेखाटलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत’ रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 वाजतापासून सर्वांसाठी खुले राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे ‘शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर’ व्याख्यान होणार आहे.

‘शिव कल्याण राजा’ संगीतमय कार्यक्रम

स्वरभारती प्रस्तुत ‘शिव कल्याण राजा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन 17 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजता करण्यात येणार आहे. प्रसिध्द गायक व संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व कलाकार संगीतमय प्रस्तुती देतील तर विद्यावचस्पती शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

शिवप्रतिमेला पुष्पार्पणाने महोत्सवाची सांगता

येथील मिंटो रोड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पार्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिनी 19 फेब्रुवारी 2019 रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे. सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget