(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वसई-विरार मनपाला शहर स्तर संघाचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या

वसई-विरार मनपाला शहर स्तर संघाचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार

वसई-विरारला वस्ती स्तर संघाचे पहिले दोन तर मिराभाईंदरला तिसरा पुरस्कार

नवी दिल्ली ( १५ फेब्रुवारी २०१९ ) : स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी वसई-विरार महानगर पालिकेच्या आकांक्षा शहर स्तर संघाने देशात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. तर राज्यातून याच महानगर पालिकेच्या सक्षम आणि युगंधरा वस्ती स्तर संघाने अनुक्रमे पहिला व दुसरा आणि मिराभाईंदर महानगर पालिकेच्या संत मदर तेरेजा संघाला तिसरा पुरस्कार मिळाला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत देशभरातील महानगर पालिका व नगरपरिषदांतर्गत कार्यरत शहरस्तर व वस्ती स्तर संघाना आज वर्ष 2018-19 करिता स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा आणि सह सचिव संजय कुमार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आकांक्षा शहर स्तर संघ ठरला देशात द्वितीय क्रमांकाचा मानकरी
वसई -विरार मनपाच्या आकांक्षा शहर स्तर संघाच्या स्वच्छता क्षेत्रातील कार्याची दखल घेत या संघास राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्रदान करण्यात आला. वसई विरार मनपाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह या संघाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आकांक्षा या शहर स्तर संघात १५ वसती स्तर संघांचा समावेश असून कच-याचे कंपोस्ट खत बनविणे, ओला व सुखा कचरा यांचे वर्गीकरण करणे तसेच स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचे कार्य या संघाने केले. दोन लाख रूपये , प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वसई-विरारला वसती स्तर संघाचे पहिले दोन तर मिराभाईंदरला तिसरा पुरस्कार
या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातील सर्वोत्तम तीन वस्ती स्तर संघांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून वसई-विरार महानगर पालिकेच्या सक्षम वस्ती स्तर संघाला प्रथम तर याच महानगर पालिकेच्या युगंधरा वसती स्तर संघाला द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. वसई-विरार मनपाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह या संघाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या संत मदर तेरेजा वस्ती स्तर संघाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक वस्ती स्तर संघात 20 महिला बचत गटांचा समावेश असतो.

प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे. द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप दीड लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह तर तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget