नवी दिल्ली ( ५ फेब्रुवारी २०१९ ) : प्रसिध्द नाटय लेखक अभिराम भडकमकर,नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2019 रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात येणारआहे.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करते. याच परंपरेत बुधवारी राष्ट्रपती भवनात होणा-या एका शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४ कलाकारांसह देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाटय अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
नाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भडकमकर यांनी गेली दोन दशकं नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे. नाटक, सिनेमा, कथा कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे भडकमकर उत्तम कलावंतही आहेत. ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि आजच्या मालिका विश्वाच्या पडदयामागच्या वास्तवाच दर्शन घडवणारी ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्टयपूर्ण ठरली. दिल्लीतील राष्ट्रीय नाटय् विद्यालयात कलेचे धडे गिरवणारे भडकमकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहीली आहे. ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शीत केला आहे. विविध नाटकही त्यांनी लिहीली आहेत.
नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सुनील शानबाग यांची नाटय दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिध्द नाटय दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या सोबत त्यांनी 1974 ते 1984 अशा सलग दहा वर्ष 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. शानबाग यांनी कला क्षेत्रातील मित्रांच्या सहकार्याने 1985 मध्ये ‘अपर्णा रिप्रेटरी कंपनीची’ स्थापना केली व या माध्यमातून वर्षाला 50 नाटय प्रयोग होत असत. शानबाग यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन् केले आहे.
प्रसिध्द तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. सामसी यांनी पं. एच. तारंथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्यावर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले. यानंतर सामसी यांना सलग दोन दशक प्रसिध्द तबला वादक उस्ताद अल्लारखाँ खान यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसिध्द गायक व नृत्यकालाकारांना सामसी यांनी तबल्याची साथ केली यात उस्ताद विलायत खाँ, पं. अजय चक्रवर्थी, पं. भिमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं.शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांचा समावेश आहे.
लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात येणार आहे. लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ खांडगे १९७८ पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर, लोककला संशोधन केंद्राचे ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे आणि ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली. डॉ. खांडगे यांनी चीनमध्ये लोककला लोकसंगीत परिषदमध्ये चार वेळा प्रतिनिधित्व केले, तर सॅन होजे येथे विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी व्याख्यान दिले. नॅशविलमध्ये अमेरिकन फोकलोअर सोसायटीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ते राज्य आणि केंद्राच्या विविध सांस्कृतिक समित्यांवर कार्यरत आहेत. ‘प्रयोगात्म लोककला’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.
१ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९५२ पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
डॉ संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशीफ
ललीत कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात येणार आहे. प्रसिध्द भरत नाटयम नृत्यांगणा असलेल्या डॉ. पुरेचा या मुंबई स्थित कला परिचय संस्थेच्या संचालीका तसेच सरफोजीराजे भोसले भरत नाटयम प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडून डॉ. पुरेचा यांनी भरत नाटयमचे धडे घेतले. त्यांनी ‘नाटय शास्त्र’ विषयावर संशोधनही केले आहे. त्यांना या कार्यक्रमात फेलोशीफ ३ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

टिप्पणी पोस्ट करा