(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ; ४२ जवान शहीद | मराठी १ नंबर बातम्या

सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ; ४२ जवान शहीद

नवी दिल्ली ( १४ फेब्रुवारी २०१९ ): काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला येथील पुलवामात झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४२ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जम्मूमधून दुपारी साडे तीन वाजता अडीच हजार जवान श्रीनगरला जात होते. सीआरपीएफच्या ७८ गाड्यांमध्ये अडीच हजार जवान होते. श्रीनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर अवंतिपुरामध्ये जवानांच्या गाड्या पोहोचताच या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.

जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. पाकिस्तानमधल्ये आयएसआयने या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण दिले. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget