(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विश्व मल्लखांब स्पर्धेतील अजिंक्यपद | मराठी १ नंबर बातम्या

विश्व मल्लखांब स्पर्धेतील अजिंक्यपद

मुंबई, दि. 20 : विश्व मल्लखांब स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविलेल्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिनंदन केले.

मुंबई उपनगर मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार भाई गिरकर, दत्ताराम दूधम, भारतीय संघातील मल्लखांबपटू दिपक शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता सागर ओहाळकर यांनी पदक व अजिंक्यपद चषकासह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन स्पर्धेतील यशाची माहिती दिली.

विश्व मल्लखांब फेडरेशनच्यावतीने मुंबईतील समर्थ व्यायाम मंदिर येथे आयोजित या स्पर्धेत सुमारे पंधरा देश सहभागी झाले होते. स्पर्धेत भारताच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. तर दिपक शिंदे याने दोन सुवर्ण, तीन रौप्य पदकांची कमाई करत स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीत पहिले, तर ओहाळकरने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक मिळवून दुसरे स्थान पटकाविले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघाचे तसेच मल्लखांबपटुंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget