गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात आज काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उपस्थित इतर मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज गेट वे ऑफ इंडिया येथे जाहीर कार्यक्रमात खेळाडूंना देण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह क्रीडा मंत्री विनोद तावडे, क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त नरेंद्र सोपल, क्रीडा संचालक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यावेळी म्हणाले की, खेळांप्रति महत्वाकांक्षा, वचनबद्धता आणि निराकरण क्षमता असल्यास आपण खेळ विश्वातील सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो. पुढच्या वर्षी टोकियोमध्ये ऑलिंपिक गेम आणि पुढील दोन वर्षात आशिया गेम्स चीनमधील हुआंगझूमध्ये होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतातील क्रीडापटूंना मेहनतीने आणि सज्जतेने सहभागी होण्याचे आवाहन राज्यापल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी केले.
येणाऱ्या काळात तरुण व आश्वासक खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी निवृत्त खेळाडूंची क्षमता वापरली जाणे आवश्यक असल्याचे राव यांनी सांगितले. आपली सर्वात मोठी ताकद हे आपले समर्पित प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त खेळाडू आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी देशाला आणि राष्ट्राला अभिमान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या खेळाडू, खेळाडू प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, दिव्यांग खेळाडु यांप्रति अभिमान व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातल्या सर्वच तरुण खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यात महाराष्ट्र क्रीडा आणि खेळांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध करेल, अशी आशा व्यक्त केली.
मंत्री तावडे यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
पालक मुलांना खेळामध्ये करीअर करु देण्यास सहज तयार होत नाहीत. पण अलीकडच्या काळात पालकांचाही क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. आज विदयार्थ्यांनी खेळात चांगले प्रावीण्य मिळविले तर तो विदयार्थी भविष्यात खेळामध्येच चांगले करीअर करु शकतो. शारीरिक कौशल्ये आणि क्षमता भरपूर असलेल्या मुलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. नव्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता असते. क्रीडा मंत्री म्हणून मला सांगण्यास आनंद वाटतो की,आज महाराष्ट्रात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी राज्य सरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याबरोबरच खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार शासकीय सेवेत थेट नियुक्तीही देण्यात येत असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.
सन 2017-18 या वर्षांतले शिवछत्रपती पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांच्यासह खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात आले.
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना वितरीत करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स, मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबडडी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो).
सन 2017-18 या वर्षासाठी
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
अ.क्रं
|
खेळाचे नाव
|
पुरुष
|
महिला
|
1
|
आर्चरी
|
प्रविण रमेश जाधव
|
भाग्यश्री नामदेव कोलते
|
2
|
ॲथलेटिक्स
|
सिध्दांत उमानंद थिंगलिया
(थेट पुरस्कार)
|
मोनिका मोतीराम आथरे
(थेट पुरस्कार)
|
कालिदास लक्ष्मण हिरवे
|
मनीषा दत्तात्रय साळुंखे
|
||
3
|
ट्रायथलॉन
|
अक्षय विजय कदम
|
--
|
4
|
वुशु
|
शुभम बाजीराव जाधव
|
श्रावणी सोपान कटके
|
5
|
स्केटिंग
|
सौरभ सुशील भावे
|
--
|
6
|
हॅण्डबॉल
|
महेश विजय उगीले
|
समीक्षा दामोदर इटनकर
|
7
|
जलतरण
|
श्वेजल शैलेश मानकर
|
युगा सुनिल बिरनाळे
|
8
|
कॅरम
|
पंकज अशोक पवार
|
मैत्रेयी दत्तात्रय गोगटे
|
9
|
जिम्नॅस्टिक्स
|
सागर दशरथ सावंत
|
दिशा धनंजय निद्रे
|
10
|
टेबल टेनिस
|
सुनील शंकर शेटटी
|
--
|
11
|
तलवारबाजी
|
अक्षय मधुकर देशमुख
|
रोशनी अशोक मुर्तंडक
|
12
|
बॅडमिंटन
|
अक्षय प्रभाकर राऊत
|
नेहर पंडित
|
13
|
बॉक्सिंग
|
--
|
भाग्यश्री शिवकुमार पुरोहित
|
14
|
रोईंग
|
राजेंद्र चंद्रबहादुर सोनार
|
पुजा अभिमान जाधव
|
15
|
शुटींग
|
--
|
हर्षदा सदानंद निठवे
|
16
|
बिलीयर्डस अँड स्नूकर
|
धृव आश्विन सित्वाला
|
--
|
सिध्दार्थ शैलेश पारीख
|
--
|
||
17
|
पॉवरलिप्टींग
|
मनोज मनोहर गोरे
|
अपर्णा अनिल घाटे
|
18
|
वेटलिप्टींग
|
--
|
दिक्षा प्रदीप गायकवाड
|
19
|
बॉडीबिल्डींग
|
दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी
|
--
|
20
|
मल्लखांब
|
सागर कैलास ओव्हळकर
|
--
|
21
|
आटयापाट्या
|
उन्मेष जीवन शिंदे
|
गंगासागर उत्तम शिंदे
|
22
|
कबड्डी
|
विकास बबन काळे
|
सायल संजय केरीपाळे
|
23
|
कुस्ती
|
उत्कर्ष पंढरीनाथ काळे
|
रेश्मा अनिल माने
|
24
|
खो-खो
|
अनिकेत भगवान पोटे
|
ऐश्वर्या यशवंत सावंत
|
25
|
बुध्दीबळ
|
राकेश रमाकांत कुलकर्णी
(थेट पुरस्कार)
|
दिव्या जितेंद्र देश्मुख
(थेट पुरस्कार)
|
रोनक भरत साधवानी
(थेट पुरस्कार)
|
सलोनी नरेंद्र सापळे
(थेट पुरस्कार)
|
||
हर्षिद हरनीश राजा
(थेट पुरस्कार)
|
--
|
||
26
|
लॉन टेनिस
|
--
|
त्रृतुजा संपतराव भोसले
|
27
|
व्हॉलीबॉल
|
--
|
प्रियांका प्रेमचंद बोरा
|
28
|
सायकलिंग
|
रवींद्र बन्सी करांडे
|
वैष्णवी संजय गभणे
|
29
|
स्कॅश
|
महेश दयानंद माणगावकर
|
उर्वशी जोशी
|
30
|
क्रिकेट
|
--
|
स्मृती मानधना
|
31
|
हॉकी
|
सुरज हरिशचंद्र करेकरा
|
--
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) - मुंबई विभागाचे अंकुर भिकाजी आहेर, पुणे विभागाचे महेश चंद्रकांत गादेकर, कोल्हापूर विभागाचे मुन्ना बंडू कुरणे, अमरावती विभागाचे डॉ.नितीन गणपतराव चवाळे, नाशिक विभागाचे संजय आनंदराव होळकर, लातूर विभागाचे जर्नादन एकनाथ गुपिले, नागपूर विभागाचे राजेंद्र शंकरराव भांडारकर.
सन 2017-18 या वर्षांसाठी दिव्यांग खेळाडूंना
एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार
अ.क्रं
|
पुरुष
|
महिला
|
1
|
संदिप प्रल्हाद गुरव
व्हीलचेअर -तलवारबाजी (थेट पुरस्कार)
|
मानसी गिरीशचंद्र जोशी
बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
|
2
|
मार्क जोसेफ धर्माई
बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
|
रुही सतीश शिंगाडे
बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
|
3
|
सुकांत इंदुकांत कदम
बॅडमिंटन (थेट पुरस्कार)
|
गीतांजली चौधरी
जलतरण
|
4
|
स्वरुप महावीर उन्हाळकर
नेमबाजी (थेट पुरस्कार)
|
--
|
5
|
चेतन गिरीधर राऊत
जलतरण
|
--
|
6
|
आदिल मोहमंद नाझिर अन्सारी
आर्चरी (थेट पुरस्कार)
|
--
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे देण्यात आले. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे आहे.
बुद्धीबळ खेळातील पुरस्कार प्राप्त सलोनी नरेंद्र सापळे तसेच स्क्वॅश खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू महेश दयानंद मानगांवकर यांनी पुरस्कारातून प्राप्त धनराशी पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले.
टिप्पणी पोस्ट करा