मुंबई ( १ मार्च २०१९
) : कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी आहे. म्हणूनच ही कला राजाश्रीत नाही तर राजपुरस्कृत होणे आवश्यक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास या कलांचे श्रेष्ठत्व वाढून नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन २०१७-१८ या वर्षातील पुरस्काराचे आज चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयात वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यासह हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.शितलाप्रसाद दुबे, हिंदी साहित्य अकादमीचे माजी कार्याध्यक्ष नंदलाल पाठक, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्र, कर्नल लेफ्टनंट मनोजकुमार सिन्हा, विधायक मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते. हिंदी साहित्य अकादमीमार्फत तीन प्रकारचे पुरस्कार दिले गेले. यामध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्य स्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, तसेच २० विधा पुरस्कार अशा एकूण ३० पुरस्कारांचा समावेश होता. तावडे यावेळी म्हणाले, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या लेखकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्ये लेखन करणेही आवश्यक आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचेल.
राज्यातील सांस्कृतिक आणि साहित्यिक ठेवा जपताना विविध साहित्यिकांचे योगदान जपण्याचे काम महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने विविध भाषांतील साहित्याचा अनुवाद हिंदी भाषेत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन तावडे यांनी केले.
यावर्षी 'अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव' पुरस्कारांमध्ये 'महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार' रंगनाथ तिवारी आणि डॉ. 'राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार' रामेश्वरनाथ मिश्र 'अनुरोध' यांना प्रदान करण्यात आला.
'राज्य स्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार' पुरस्कारांतर्गत 'छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार' प्रेम शुक्ल, 'साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार' मंजु लोढा, 'पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी
सेवा पुरस्कार' डॉ. तेजपाल चौधरी, 'डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार' पूजाश्री, 'गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार' सुधीर ओखदे, 'कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक
पुरस्कार' माणिक बाबुराव मुंडे, 'व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार' डॉ. विनोद नारायण इंदुरकर, 'सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार' डॉ. श्रीभगवान तिवारी यांना प्रदान करण्यात आला.
'विधा' पुरस्कारांतर्गत 'काव्य' या विधासाठी देण्यात येणारा 'संत नामदेव पुरस्कार' शीतला पांडेय- समीर 'अनजान' यांना स्वर्ण, सुधा राठौर यांना रजत तसेच डॉ. मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. 'कहानी' या विधासाठी देण्यात येणारा 'मुंशी प्रेमचंद पुरस्कार' मंजुला जोशी यांना स्वर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, तसेच डॉ. शशि वर्धन शर्मा-(शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'निबंध' या विधासाठी देण्यात येणारा 'आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार' प्रभा मेहता यांना स्वर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'समीक्षा' या विधासाठी देण्यात येणारा 'आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार' डॉ. मजीद शेख यांना स्वर्ण, डॉ.पंडित बन्ने यांना रजत, तसेच डॉ. शशिकांत सोनवणे 'सावन' यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'अनुवाद' या विधासाठी देण्यात येणारा 'मामा वरेरकर पुरस्कार' कुमुद संघवी चावरे यांना स्वर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना रजत पुरस्कार देण्यात आला. 'वैज्ञानिक तकनीकी' या विधासाठी देण्यात येणारा 'होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार' मुकेश ग. पंडया यांना देण्यात आला आहे. 'हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन' या विधासाठी देण्यात येणारा 'पं. महावीर प्रसाद व्दिवेदी कांस्य पुरस्कार' डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना देण्यात आला आहे. 'नाटक' या विधासाठी देण्यात येणारा 'विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार' डॉ. मधुकर राठोड यांना देण्यात आला. 'जीवनी-परक साहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'काका कालेलकर रजत पुरस्कार' डॉ. जितेन्द्र पाण्डेय यांना देण्यात आला आहे. 'पत्रकारिता-कला' या विधासाठी देण्यात येणारा 'बाबुराव विष्णु पराडकर कांस्य पुरस्कार' अनूप श्रीवास्तव यांना, तर 'लोकसाहित्य' या
विधासाठी देण्यात येणारा 'फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार' निर्मला डोसी यांना देण्यात आला. 'बालसाहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'सोहनलाल व्दिवेदी कांस्य पुरस्कार' नीलम सक्सेना 'चंद्रा' यांना देण्यात आला.
सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृति चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. 'अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव' पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये रोख, 'राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप 51 हजार रुपये रोख असे आहे. विधा पुरस्कार स्वर्ण, रजत, कांस्य अशा तीन प्रकारात अनुक्रमे 35 हजार रुपये, 25 हजार रुपये आणि 11 हजार रुपये अशा स्वरुपात देण्यात येतो.

टिप्पणी पोस्ट करा