मुंबई ( २९ मार्च २०१८ ) : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 278 पैकी 99 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 179 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 278 पैकी 99 उमेदवारांनी माघार घेतली. मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा लोकसभा मतदार संघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, बीड 36, उस्मानाबाद 14, लातूर 10 आणि सोलापूर मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज 11 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदार संघात कालपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. आज सहा मतदारसंघात 11 तर आजपर्यंत 9 मतदार संघात 20 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदार संघात आज 1 (आजपर्यंत 2 उमेदवार), औरंगाबाद 3 (4), रायगड 2 (4), सातारा 1 (1), कोल्हापूर 2 (2) आणि हातकणंगले मतदार संघात आज 2 उमेदवारांनी तर आजपर्यंत 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहे. तीन मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही मात्र आजपर्यंत 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये रावेर, जालना आणि सांगली मतदार संघात प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात आतापर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा