(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ए-सॅटच्या सहाय्याने मिशन शक्ती यशस्वी मुख्यमंत्र्यांकडून शास्त्रज्ञांसह प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन | मराठी १ नंबर बातम्या

ए-सॅटच्या सहाय्याने मिशन शक्ती यशस्वी मुख्यमंत्र्यांकडून शास्त्रज्ञांसह प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई ( २७ मार्च २०१८ ) : भारतीय बनावटीच्या ‘ए-सॅट’च्या सहाय्याने यशस्वी करण्यात आलेल्या मिशन शक्तीमुळे अंतरिक्ष क्षेत्रात भारताची ताकद वाढल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेतील शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या सर्वांसाठी ‘ए-सॅट’ची (अँटी सॅटेलाईट) यशस्विता ही आनंदाची घटना असून भारतीय म्हणून माझ्यासाठी ती गौरवाची आहे. मिशन शक्तीमुळे भारताने अंतरिक्ष क्षेत्रात आपली सामरिक ताकद सिद्ध केली आहे. प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे युद्धासाठी नव्हे तर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अशी ताकद निर्माण करणे आवश्यक असते. भारताने यापूर्वी कधीही दुसऱ्यांवर हल्ला केला नाही. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे जगातील निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. अमेरिका व चीनला अशी शक्ती प्राप्त करण्यास बराच काळ लागला. त्या तुलनेत भारतीय वैज्ञानिकांनी ही मोहीम अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली आहे. शक्तीशाली देशच शांतता प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे भारताच्या शक्तीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख प्राप्त होत आहे. येणाऱ्या काळात जगात शांतता प्रस्थापित करण्यात भारताला निश्चितच यश येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget