(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अण्णा भाऊ साठे स्मारक समिती कार्यालयाचे भाडे डिसेंबर 2018 अखेर अदा | मराठी १ नंबर बातम्या

अण्णा भाऊ साठे स्मारक समिती कार्यालयाचे भाडे डिसेंबर 2018 अखेर अदा

मुंबई ( २७ मार्च २०१८ ) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयीन खर्चाकरिता तसेच समितीच्या बसण्याची व्यवस्था, आवश्यक कर्मचारी वृंद, कार्यालयीन साहित्य इत्यादी बार्टी (पुणे)मार्फत उपलब्ध करुन देण्यात येते. या समितीच्या कार्यालयाचे भाडे डिसेंबर 2018 अखेर पर्यंत बार्टी (पुणे)मार्फत देण्यात आले आहे.

कार्यालयीन भाडे, दूरध्वनी देयक व वीज भाडे भागविण्यासाठी 25 मार्च 2019 रोजी रु.7 लाख 40 हजार 269/- इतकी रक्कम बार्टी (पुणे)मार्फत देण्यात आली. तथापि तांत्रिक कारणामुळे ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा बार्टीच्या खात्यावर परत पाठविली आहे. याचा पाठपुरावा सुरु आहे.

तसेच स्मारक समितीस आतापर्यंत बार्टीमार्फत सात टप्प्यात रु. 52 लाख 2 हजार 903/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. स्मारक समिती कार्यालयाचे भाडे थकल्यासंदर्भात विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने हा खुलासा केला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget