(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); VVPAT चे मंत्रालयात प्रात्यक्षिक | मराठी १ नंबर बातम्या

VVPAT चे मंत्रालयात प्रात्यक्षिक

मुंबई ( २७ मार्च २०१८ ) : VVPAT (व्हीव्हीपॅट) मशीनचे प्रात्यक्षिक मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघातील सर्व सभासदांसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांच्यावतीने मंत्रालयात आज आयोजित करण्यात आले होते.

मतदारांनी आपले मत ज्या कुठल्या उमेदवाराला दिले आहे त्या उमेदवाराचे नाव, त्याचा पक्ष तसेच त्याचे चिन्ह 7 सेकंदापर्यंत व्हीव्हीपॅट मशीनच्या स्क्रीनवर फक्त मतदान करणाऱ्या मतदाराला बघता येणार आहे. ज्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला केलेले मतदान झाले की नाही याची खात्री या मशीनमुळे संबंधित मतदाराला करता येणार आहे. यामध्ये मतदाराचा अनुक्रंमाक, नाव याची कुठलीही माहिती या स्क्रीनवर दिसणार नाही. मतदाराने मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर कंट्रोल युनिट हे मतदान केंद्र अध्यक्ष यांच्याकडे तर व्हीव्हीपॅट मशीन व बॅलेट युनिट हे मतदार ज्या ठिकाणी मतदान करणार आहे तिथे ठेवले जाणार आहे. 1 हजार 400 मतदार क्षमतेचे हे व्हीव्हीपॅट मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात येणार आहे.

सहाय्यक संचालक प्रदिप केदार यांच्या नेतृत्वाखालील जितेंद्र भगत, संजय रेवाळे, सखाराम गोडे, नंदन मोरे, सिरसाट या पथकाने हे प्रात्यक्षिके सादर केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget