मुंबई ( २२ मार्च २०१९ ) : लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत 30 मदत केंद्रे कार्यरत करण्यात आली असल्याने मतदारांना कधीही सहज माहिती मिळण्यास मदत होत आहे. 1950 या हेल्पलाईनवर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्हयात सुरु करण्यात आली आहे.यादवारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.
टिप्पणी पोस्ट करा