(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणूकीसाठी विविध समित्या व समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणूकीसाठी विविध समित्या व समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

मुंबई ( १६ मार्च २०१९ ) : भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार सन 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेली आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा स्तरावर निवडणूकीच्या कामकाजासाठी समन्वय अधिकारी (NODAL OFFICER) म्हणून विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


मुंबई शहर जिल्हयातील दोन लोकसभा मतदार संघा अंतर्गत त्यांना प्रत्यक्ष कामकाज करावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपआपली नेमून दिलेली कामे प्राधाम्याने करावीत, असे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.

नियुक्त केलेले समन्वय अधिकारी व असलेल्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.


निवडणूक खर्च, व्यवस्थापन - चित्रलेखा खातू, सहाय्यक संचालक, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण‍ विभाग, मंत्रालय, एक खिडकी योजना - जितेंद्र भोपळे, उपसंचालक, नगर रचना मुंबई प्रदेश, मतदार मदत केंद्र तक्रार निवारण कक्ष - श्याम खामकर, उपसंचालक, भुमी अभिलेख कोकण प्रदेश, पेड न्यूज, प्रसार माध्यम व एमसीएमसी कमिटी - डॉ. पुरुषोत्तम द. पाटोदकर, वरिष्ठ सहाय्यक संचालक, मंत्रालय, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचार संहिता व पोलिस दल नियोजन - मंजूनाथ सिंगे, उपआयुक्त (अभियान), नवीन पोलीस आयुक्त कार्यालय व वैशाली लंभाते, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) अंधेरी, संगणकीकरण व्यवस्थापन - कविता पाटील, जिल्हा सुचना अधिकारी, एन.आय.सी. व अनुपम खामकर, FMS अभियंता, एन.आय.सी., स्वीप व्यवस्थापन, कम्युनिकेशन प्लॅन जिल्हा आराखडा - श्रीमती फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई, ईव्हीएम व्यवस्थापन व ईव्हीएम/व्हीव्हीपॅट जनजागृती, स्ट्रॉग रुम व्यवस्थापन - तरुणकुमार खत्री, उपजिल्हाधिकारी, प्रकाश भोसले, नायब तहसिलदार, निवडणूक विभाग, निवडणूक निरिक्षक व्यवस्थापन - महेश इंगळे, अधिक्षक, भूमापन व भूमी अभिलेख विभाग, अनिल बा. चासकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पी.डी.चव्हाण, सहा. अधिक्षक भूमापन व भूमीअभिलेख विभाग, व सुनिल कदम, सहाय्यक अधिक्षक भूमापन व भूमीअभिलेख विभाग, निवडणूक प्रशिक्षण - फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रविंद्र हजारे, मुद्रांक जिल्हाधिकारी, तरुणकुमार खत्री, उपजिल्हाधिकारी व अंजली भोसले, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), धारावी विभाग, निवडणूक इतिवृत्त व इतर अनुषंगिक कामे - विणा सावर्डेकर, वरिष्ठ लघुलेखिका व पंकज लोणारे, लघुलेखक (निम्न श्रेणी), मतदान साहित्य व्यवस्थापन - प्रविण भावसार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वरळी, पल्लवी तभाने, तहसिलदार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, डॅश बोर्ड मॉनिटरिंग व आयोगाकडे अहवाल पाठविणे - कविता पाटील, जिल्हा सुचना अधिकारी, वाहन अधिग्रहित नियोजन आवश्यकता व उपलब्धता/वाहतुक आरखडा - सुभाष पेडामकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) मध्य, ताडदेव मुंबई, पी.डी. चव्हाण, सहा. अधिक्षक व सुनिल कदम, सहा. अधिक्षक, अधिकारी/कर्मचारी नियुक्ती - संपत डावखर, निवासी उपजिल्हाधिकारी, प्रकाश कुटे, अव्वल कारकून, अनिल जोगी, अव्वल कारकून व जयकुमार तांबे, लिपिक टंकलेखक, जनसंपर्क व प्रसिध्दी कक्ष - डॉ. पुरुषोत्तम द. पाटोदकर, वरिष्ठ सहा. संचालक, मंत्रालय, सूक्ष्म निरिक्षक (MICRO OBSERVER) - संपत डावखर, निवासी उपजिल्हाधिकारी, दिव्यांग कक्ष - प्रसाद खैरनार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, चेंबूर मुंबई, मतमोजणी आराखडा नियोजन व्यवस्थापन - बी.जी. गावंडे, (अति/निष्का) पर्व उपनगरे, चर्चगेट व सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी, तक्रार निवारण कक्ष (हेल्पलाईन कक्ष) - श्यामसुदर सुरवसे, तहसिलदार, मुंबई व पंकज लोणारे, लघुलेखक निम्न श्रेणी, मतदान केंद्राची तपासणी सेवा सुविधा आढावा - श्यामसुंदर सुरवसे, तहसिलदार, मुंबई व प्रशांत सावंत, तहसिलदार, पोस्टल बॅलेट/बॅलेट पेपर छपाई - सुनिल भुताळे, उपजिल्हाधिकारी व पल्लवी तभाने, तहसिलदार, समन्वय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क - अनिल बा. चासकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, 30 - मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ समन्वयक - अभिजित देशमुख, तहसिलदार (अति/निष्का) चेंबूर, 31-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघ समन्वयक - दयालसिंग ठाकूर, तहसिलदार (अति/निष्का) धारावी.

भारत निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी आलेल्या सूचना व आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश श्री. जोंधळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget