(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राष्ट्रीयस्तर) १६ जून २०१९ रोजी | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राष्ट्रीयस्तर) १६ जून २०१९ रोजी

मुंबई ( २८ मार्च २०१८ ) : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS इ. १० वी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा लोकसभा निवडणूक कामकाजामुळे रविवार दिनांक १२ मे ऐवजी रविवार दि. १६ जून २०१९ रोजी होणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एप्रिल २०१९ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एन.सी.ई.आर.टी. (NCERT) नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इ. १० वी साठी राज्यस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत ०४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आली होती. एनटीएस इ. १०वी परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी नोंदवण्यात आले होते. एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्लीकडून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा ठरवण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या ३८७ विद्यार्थ्यांची निवड यादी १ मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. तथापि एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्रासाठी सन २०१८-१९ वं सन २०१९-२० साठी सुधारित कोटा ७७४ विद्यार्थी इतका देण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील(General) ३९१, इतर मागास वर्गीय संवर्गातील २०९, अनुसूचित जाती (SC) ११६ व अनुसूचित जमाती (ST) ५८ अशा एकूण ७७४ विद्यार्थ्यांचा कोटा देण्यात आलेला आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून ७७५ विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संबंधित संवर्गात अपगांसाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे. ही सुधारित निवडयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttp://nts.mscescholarshipexam.in वेबसाईटवर १९ मार्च रोजी सायं. ५.०० वाजता जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड जात/अपंगत्व आरक्षणातून झालेली आहे, त्यांनी सदर प्रमाणपत्राची सत्य प्रत प्रवेशपत्रासोबत एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांना सादर केल्याशिवाय त्यांची निवड कायम समजण्यात येणार नाही.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget