(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लोकसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल | मराठी १ नंबर बातम्या

लोकसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई ( १९ मार्च २०१९ ) : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज राज्यातील तीन मतदारसंघात एकूण 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

7 लोकसभा मतदार संघात काल पहिल्या टप्प्याची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर आज 10 लोकसभा मतदार संघातील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. आज 11- भंडारा- गोंदिया मतदार संघात सुहास अनिल फुंदे (अपक्ष) आणि भीमराव डी. बोरकर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया(डी)) यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली. 16- नांदेड लोकसभा मतदार संघात पठाण जाफर अली खान एम. खान (इंडियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) यांनी आणि 42- सोलापूर मतदार संघात वेंकटेश्वर एम. अलियास खटकधोंड (हिंदुस्थान जनता पार्टी) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

काल 10- नागपूर लोकसभा मतदार संघात अब्दुल करीन अब्दुल गफ्फार पटेल (अपक्ष) यांनी आणि 14- यवतमाळ मतदार संघात सुनील नटराजन नायर (अपक्ष) आणि रमेश जी. पवार (भारतीय बहुजन आघाडी जनता दल (एस.)) यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget