(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 730 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 730 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

मुंबई ( १५ मार्च २०१९ ) : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आज 730 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. यात भरारी पथकात, Static Surveillance Team, Video Surveillance Team व Video Viewing Team मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी 10 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात राजकीय पक्ष व उमेदवार हे आचारसंहितेचे काटेकोर पालन करतात किंवा नाही यावर लक्ष कसे ठेवावे व भंग झाल्यास काय कारवाई करावी याबबत आचारसंहितेच्या समन्वय अधिकारी श्रीमती माधवी सरदेशमुख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर रोकडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी 104 भरारी पथके, 78 Static Surveillance Team, 78 Video Surveillance Team व 26 Video Viewing Team विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापित करण्यात आलेल्या आहेत. आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget