युवा वर्गाने मतदार नोंदणीसाठी पुढे यावे
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन
मुंबई ( १ मार्च २०१९ ) : मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 2 व रविवार दि. 3 मार्च रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या व्यक्तिंबरोबरच दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकास मतदार नोंदणीस पात्र होणाऱ्या युवा वर्गाने मतदार नोंदणीसाठी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना केले. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष
मोहोड उपस्थित होते.
शिंदे यांनी माहिती दिली, दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी दि. 23 आणि 24
फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक 23 फेब्रुवारी रोजीच्या विशेष मोहिमेवेळी 1 लाख 2 हजार 262 तर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी 1 लाख 50 हजार 984 अशा एकूण 2 लाख 53 हजार 246 नवीन मतदारांनी नोंदणी केली.
या दोन दिवसाच्या मोहिमेवेळीही मतदार नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवार आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नाव नोंदणीचे अर्ज स्वीकारणार येणार आहेत.
तसेच अंतिम मतदार यादीदेखील बीएलओंकडे उपलब्ध असेल. मतदार यादीतील नाव तपासणे, मतदान केंद्र तपासणे यासह नाव व इतर तपशीलात दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठीचे सर्व प्रकारच्या अर्जांचे नमुने बीएलओंकडे उपलब्ध असतील. गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचन करण्यात येणार आहे.
‘एकही मतदार वंचित राहू नये’ हे या वर्षीचे बोधवाक्य भारत निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. त्यानुसार दिव्यांग नागरिकांना (पर्सन्स विथ डिसॅबिलीटी- पीडब्ल्यूडी) विशेष सुविधा उपलब्ध करुन
देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष प्राधान्य दिले आहे. दिव्यांग नागरिकांची नोंदणी करुन त्यांनी मागणी केल्यास मतदान केंद्रावर येण्या- जाण्यासाठी वाहन, मदतनीस, मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हीलचेअर अशा सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून PwD मोबाईल ॲप विकसित करण्यात येत असून त्याद्वारे दिव्यांग नागरिकांना विविध सुविधांसाठी मागणी नोंदविता येणार आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा