(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्ती वेतनासाठी जन्म तारखेचा पुरावा 20 मार्चपर्यत पाठवावा | मराठी १ नंबर बातम्या

निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्ती वेतनासाठी जन्म तारखेचा पुरावा 20 मार्चपर्यत पाठवावा

मुंबई ( १२ मार्च २०१९ ) : अधिदान व लेखा कार्यालय (P.A.O)वांद्रे-मुंबई येथून निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यांनी जन्म तारखेचा पुरावा 20 मार्चपर्यंत कार्यालयास पाठवावा, असे सहायक लेखा व अधिदान अधिकारी यांनी कळविले आहे.

ज्या निवृत्ती वेतन धारकांचे /कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आहे. त्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मुळ निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती वेतन वाढ
करण्यात आलेली आहे. त्याची परिगणना करण्याची जबाबदारी अधिदान व लेखा कार्यालय (P.A.O)वांद्रे-मुंबई या कार्यालयाची असल्यामुळे या कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांनी, आपल्या जन्म तारखेचा पुरावा किंवा जन्म तारखेचा उल्लेख असलेली अधिप्रमाणित कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. हा पुरावा या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन किंवा पोस्टाने (पत्ता-अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोष भवन, ‘ए’ विंग कौटुंबिक न्यायालयाजवळ, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-400051) या पत्त्यावर किंवा ई-मेल (pao@mahakosh.in) द्वारे दिनांक 20 मार्च पर्यंत पाठवावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget