(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

अनधिकृत फलकांसाठी 16 प्रकरणात पोलिसात तक्रार

मुंबई ( १६ मार्च २०१९ ) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी दि. 10 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघात आचारसंहितेची अंमलबजावणी होत आहे. आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 9 हजार 298 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेडे काढून टाकण्यात आले आहेत. तर, खाजगी मालमत्तेवरील 2 हजार 260 असे एकुण 11 हजार 558 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेडे काढून टकण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिरात फलकांच्या 16 प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहकार्य करण्यासाठी सह आयुक्त/ उपायुक्त यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या सहायक आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे.

आचारसंहिता काळात राजकीय पक्ष व उमेदवार हे आचारसंहितेचे काटेकोर पालन करतात किंवा नाही यावर लक्ष कसे ठेवावे व भंग झाल्यास काय कारवाई करावी, याबाबत नुकतेच प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget