(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई शहर जिल्ह्यात 24 लाख 57 हजार मतदार | मराठी १ नंबर बातम्या

मुंबई शहर जिल्ह्यात 24 लाख 57 हजार मतदार

मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

मुंबई ( १५ मार्च २०१९ ) : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि.10 मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्हयात 30 मुंबई दक्षिण- मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदार संघ असून 24 लाख 57 हजार 26 पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्हयात सोमवार, दि. 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होईल व सोमवार, दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्हयातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, शिवाजी जोंधळे, यांनी केले आहे.

2601 मतदान केंद्र व 35 हजार कर्मचारी

दिनांक 31 जानेवारी,2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार एकूण 24 लाख 56 हजार 497 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 44 हजार 955 व स्त्री मतदार 11 लाख 11 हजार 437 इतर 105 अशी मतदारांची संख्या आहे. यात 18 ते 19 वयोगटातील मतदार 17 हजार 404 असुन 80 वयापेक्षा अधिक असे 1 लाख 35 असे मतदार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हयात एकूण 2601 मतदान केंद्र आहेत. लोकसभेची निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी साधारणत: 35 हजार कर्मचारी कार्यरत असतील.

टोल फ्री क्रमांक

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी 40 फिरती पथके - (Flying Squad) 30 स्थिर देखरेख पथके (Static Surveillance Team) 20 पथके (Video Surveillance Team) व 11 दृकश्राव्य चित्रिकरण पथके (Video Viewing Team) विधानसभा मतदार संघनिहाय स्थापित करण्यात आलेले आहेत.

नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई शहर जिल्हयासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे.

मिडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC)

केबल, दूरचित्रवाणी, सोशल मिडिया तसेच इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रसारित करावयाच्या निवडणूक जाहिरातीची पडताळणी व परवानगीसाठी मिडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 02/04/2019 (मंगळवार)

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 09/04/2019 (मंगळवार)

* नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 10/04/2019 (बुधवार)

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12/04/2019 (शुक्रवार)

* मतदानाचा दिनांक 29/04/2019 (सोमवार)

* मतमोजणी दिनांक 23/05/2019 (गुरुवार)

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27/05/2019 (सोमवार)

मुंबई शहर जिल्हयातील 10 विधानसभा मतदार संघापैकी 6 मतदार संघ, 31 – मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात तर उर्वरित 4 विधानसभा मतदार संघ, 30- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यांतील अणुशक्तीनगर व चेंबूर हे दोन विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम यांनी दिली.

मतदारसंघ, व मतदान केंद्र

30- मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघ, निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार,

अ.क्र.
सहा.निवडणूक अधिकारी व विधानसभा मतदारसंघ
पुरुष मतदार

स्त्री मतदार

इतर

एकूण

मतदान केंद्र
1
रवींद्र हजारे
178 - धारावी
1,39,206
1,05,019
0
2,44,225
283
2
अंजली भोसले
179- सायन कोळीवाडा
1,41,526
1,09,040
53
2,50,619
267
3
बी.जी.गावंडे
180- वडाळा
1,04,153
95,134
0
1,99,287
224
4
स्वाती कार्ले
181 - माहिम
1,17,181
1,13,707
32
2,30,920
249


अ.क्र.
सहा.निवडणूक अधिकारी व विधानसभा मतदारसंघ
पुरुष मतदार

स्त्री मतदार

इतर

एकूण

मतदान केंद्र
1
पद्याकर रोकडे,
172 - अणुशक्तीनगर
1,31,619
1,10,604
2
2,42,297
250
2
ज्ञानेश्वर खुटवड
173 - चेम्बूर
1,31,659
1,16,595
3
2,48,257
285


      31 - मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी, 

अ.क्र.
सहा.निवडणूक अधिकारी व विधानसभा मतदारसंघ
पुरुष मतदार

स्त्री मतदार

इतर

एकूण

मतदान केंद्र
1
सुषमा सातपुते
182 - वरळी
1,47,361
1,17,073
1
2,64,435
243
2
बाळा वाघमारे
183 - शिवडी
1,50,536
1,23,661
0
2,74,197
259
3
दादाराव दातकर
184 - भायखळा
1,29,462
1,10,479
7
2,39,948
255
4
किरण सुधाकर पाणबुडे
185- मलबार हिल
1,33,755
1,21,772
3
2,55,530
277
5
विश्वास गुजर
186 - मुंबादेवी
1,30,851
1,07,142
9
2,38,002
249
6
प्रशांत सुर्यवंशी
187 - कुलाबा
1,50,924
1,08,410
0
2,59,334
295
एकुण
13,44,955
11,11,437
105
24,56,497
2601

0000
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget